बदलापुरातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, चार कामगार गंभीर जखमी

By पंकज पाटील | Published: January 18, 2024 08:08 AM2024-01-18T08:08:15+5:302024-01-18T08:08:40+5:30

स्फोट एवढे भयंकर होते की त्याचा परिणाम चार ते पाच किलोमीटर परिसरात बसला

Massive explosion in chemical company in Badlapur; One dead, four workers seriously injured | बदलापुरातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, चार कामगार गंभीर जखमी

बदलापुरातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, चार कामगार गंभीर जखमी

पंकज पाटील/ बदलापूर: बदलापुरातील खरवई परिसरात असलेल्या व्ही के केमिकल या कंपनीत आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान भीषण स्फोट झाले. या स्फोटामुळे संपूर्ण कंपनीने पेट घेतला. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

खरवई गावाच्या परिसरातच व्ही के कंपनी असून या ठिकाणी रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जात होती. पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कंपनीत एकापाठोपाठ एक असे पाच स्फोट झाले. स्फोट एवढे भयंकर होते की त्याचा परिणाम चार ते पाच किलोमीटर परिसरात बसला. संपूर्ण बदलापूर शहर हादरले होते. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच दलाने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. आगीच्या वेळीस जे कामगार जखमी अवस्थेत कंपनीत पडले होते, त्यांना लागलीच बाहेर काढून उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Massive explosion in chemical company in Badlapur; One dead, four workers seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.