शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Marathi Sahitya Sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनात कल्याणातील शिक्षणतज्ज्ञ करणार आत्मक्लेश उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 17:19 IST

Marathi Sahitya Sammelan:  महेंद्र गौरीकुमार बैसाणे, असे या शिक्षण तज्ज्ञाचे नाव आहे. कोरोना काळात शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण : सध्या नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. कल्याणात राहणाऱ्या शिक्षणतज्ज्ञाने राज्य सरकारच्या निषेधार्थ आजपासून या  संमलेनामध्ये आत्मक्लेश उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.  महेंद्र गौरीकुमार बैसाणे, असे या शिक्षण तज्ज्ञाचे नाव आहे. कोरोना काळात शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महेंद्र बैसाणे हे आकाशवाणी-दूरदर्शनमधील वर्ग-२ ची नोकरी सोडून ‘विद्यार्थी आत्महत्या, करिअर कौन्सिलिंग’ या विषयांमध्ये कार्यरत आहेत. तर कोरोना काळात आपण अनेक व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यथा शालेय शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग, उद्योग विभाग आणि  इतर मान्यवरांकडे असंख्यवेळा पत्रव्यवहाराद्वारे मांडल्याची माहिती महेंद्र बैसाणे यांनी दिली. तसेच आपण शासन दरबारी सतत पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून कोणतीही उचित दखल घेतली गेली नाही किंवा कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

या कारणास्तव नाशिकमध्ये आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कोणताही मोडता न घालता सोमवार ६ डिसेंबरनंतर आत्मक्लेश म्हणून उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बैसाणे यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे ही माहिती कळवली असून याप्रश्नी संबंधितांना योग्य ते आदेश देण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक