'गणपत शेठच्या नादाला लागू नकोस, बाबा सिद्दिकी होईल'; महेश गायकवाडांना धमकीचे पत्र मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 17:14 IST2025-03-09T17:10:16+5:302025-03-09T17:14:02+5:30
Mahesh Gaikwad : महेश गायकवाड यांना धमकीचे पत्र आल्याचे समोर आले आहे.

'गणपत शेठच्या नादाला लागू नकोस, बाबा सिद्दिकी होईल'; महेश गायकवाडांना धमकीचे पत्र मिळाले
Mahesh Gaikwad ( Marathi News ) : कल्याणमध्ये शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांना धमकीचे पत्र आल्याची माहिती समोर आली आहे. गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी होईल, असं या धमकीमध्ये म्हटल्याचं महेश गायकवाड यांनी आरोप केला. हे पत्र जेलमधून भाजपाचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनीच पाठवल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला.
या प्रकरणी महेश गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मागील काही महिन्यापूर्वी महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांचा पोलीस ठाण्यात ठाण्यात वाद झाला होता. यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.
अंबरनाथ येथील आनंद नगर येथील सामुहिक विवाह सोहळा समारंभासाठी महेश गायकवाड गेले होते. यावेळी त्यांच्या हातात एका अज्ञात व्यक्तीने एक लिफाफा दिला. गायकवाड यांना हा लिफाफा म्हणजे निवेदन असेल असे वाटले. त्यांनी तो लिफाफा पाहिला नाही. काल शनिवारी त्यांनी हा लिफाफा उघडून पाहिला असता त्यात त्यांना धमकीचे पत्र असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
धमकी पत्राचा कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा महेश गायकवाड यांचा दावा आहे.
पत्रात काय म्हटलंय?
MG तू गणपत शेठ के पिछे मत लग, नहीं तो तेरा बाबा सिद्दीकी होगा.