एका नामांकित रुग्णालयातील डॉक्टरने प्रेमप्रकरणामधून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. रुग्णालयातच काम करत असलेल्या नर्ससोबत असलेलं प्रेमप्रकरण आणि तिने सातत्याने लग्नासाठी लावलेल्या तगाद्यामुळे वैतागून या डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आणि तब्बल १० बियर प्राशन करून आणि ४५ झोपेच्या गोळ्या घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या डॉक्टरवर सध्या उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच या घटनेमुळे डोंबिवलीसह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार डोंबिवलीत एका नामांकित हॉस्पिटलमधील बड्या डॉक्टरचे रुग्णालयामधील नर्ससोबत प्रेम प्रकरण सुरू होते. दरम्यान, ही नर्स लग्नासाठी तगादा लावत होती अशी माहिती समोर येत आहे. तसेच या नर्सने काही काळापासून बोलणे बंद केल्याने हा डॉक्टर निराश झाला होता. याट नैराश्यातून या डॉक्टरने १० बिअर आणि ४५ झोपेच्या गोळ्या घेऊन जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणातील डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे स्वतःचे नामांकित हॉस्पिटल आहे. संबंधित डॉक्टरचे त्यांच्याच हॉस्पिटलमधील एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. पत्नीसोबतच्या वादामुळे डॉक्टरांनी डोंबिवली पूर्वेतील एका हायफाय सोसायटीत स्वतंत्र घर घेतले आणि तिथे राहू लागले. दरम्यान, आज बऱ्याचदा फोन करूनही डॉक्टर कोणताच प्रतिसाद देत नसल्याने कर्मचारी घरी पोहचले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Web Summary : A Dombivli doctor attempted suicide after a love affair with a nurse and pressure for marriage. He consumed beer and sleeping pills. Currently hospitalized, his condition is critical, causing a stir in the medical community.
Web Summary : डोंबिवली में एक डॉक्टर ने नर्स के साथ प्रेम संबंध और शादी के दबाव में आत्महत्या का प्रयास किया। उसने शराब और नींद की गोलियां खाईं। अस्पताल में भर्ती, हालत गंभीर, चिकित्सा जगत में हलचल।