वाईन शॉपमधून सहा लाखाची दारु चोरी, कर्मचारीच निघाला चोर

By मुरलीधर भवार | Published: April 15, 2024 05:28 PM2024-04-15T17:28:49+5:302024-04-15T17:29:36+5:30

वाईन शॉपमधून चोरी महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

liquor worth six lakhs stolen from a wine shop the employee turned out to be the thief | वाईन शॉपमधून सहा लाखाची दारु चोरी, कर्मचारीच निघाला चोर

वाईन शॉपमधून सहा लाखाची दारु चोरी, कर्मचारीच निघाला चोर

मुरलीधर भवार, कल्याण : वाईन शॉपमधून चोरी महागडी दारु चोरी करणाऱ््या तीन जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. वाईन शॉपमध्ये काम करण्यारा एक कर्मचारी दररोज पाच ते सहा हजार रुपयांची दारु चोरायचा इतर दोन साथदारांनी ती दारु बाहेर विकायला लावायचा. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी चोरट्यांची ओळख पटविली. 

गेल्या साडे तीन महिन्यापासून चोरीचा हा धंदा सुरु होता. कल्याण पूर्वेतील नेतविली परिसरातील वाईन शॉप आहे. या शॉपचे मालक लक्षात आले की, दारु विक्रीचा हिशोब जुळून येत नाही. जवळपास सहा लाखाची दारु चोरीस गेली आहे. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कोलसेवाडी पोलिस तपास करीत होते. कल्याणगुन्हे अ्न्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही तपास सुरु केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. १३ एप्रिल रोजी पोलिस कर्मचारी गोरक्ष शेकडे यांना माहिती मिळाली की, सुनिल कुंदन हा एका ठिकाणी आहे. त्या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेतले. 

धक्कादायक म्हणजे सुनिल कुंदन हा त्या वाईन शा’पमध्ये काम करणारा आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सुनिल कुंदन हा पसार झाला होता. सुनिल कुंदनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे दोन साथीदार सुरेश पाचरणे आणि नरेश भोईर यांना देखील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली. सुनील कुंदन हा तरुण वाईन शॉपच्या काऊंटरवर उभा राहायचा. त्याचे दोन मित्र एक दिवसा आड आलटून पालटून वाईनशॉपमध्ये दारु घेण्याच्या बहाण्याने जायचे. सुनिल चलाखी दाखवीत पाच ते सहा हजाराची दारु या दोघांन द्यायचा. आत्ता पर्यंत सहा लाखाची दारु या दोघांना दिली. ही दारु हे तिघे बाहेर विकायचे. यांच्याकडून काही दारु पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: liquor worth six lakhs stolen from a wine shop the employee turned out to be the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.