KDMC Water Supply : कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा, आज मध्यरात्रीपासून 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 15:23 IST2021-03-18T15:22:32+5:302021-03-18T15:23:28+5:30
KDMC Water Supply : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी गुरुत्व वाहिनीची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

KDMC Water Supply : कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा, आज मध्यरात्रीपासून 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद
कल्याण - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारवी गुरुत्व वाहिनीची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी 24 तासांचा कालावधी लागणार असल्याने गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारपासून पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे एमआयडीसीचे अधिकारी संजय ननवरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र , कल्याण डोंबिवली महानगरपालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना जांभूळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा हा 24 तास बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी पुरवठा बंद होण्यापूर्वी मुबलक पाणी साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे