शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

KDMC चा संतापजनक कारभार! इमारतीतील १० जणांच्या चुकीच्या शिक्षा १०२ सदस्यांना दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 21:05 IST

केडीएमसीने सर्वेादय सागर इमारतीचा पाणी पुरवठा केला खंडीत, केडीएमसीच्या कारवाई विरोधात रहिवासी संतप्त

मुरलीधर भवार

कल्याण - कल्याण डोंबिली महापालिकेने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु केली आहे. कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सागर या इमारतीमधील ११२ सदनिकाधारकांपैकी १० जणांनी मालमत्ता कर भरलेला नाही. त्याची शिक्षा १०२ सदनिकाधारकांना बसली आहे. महापालिकेच्या क प्रभाग कार्यालयाने इमारतीचा पाणी पुरवठाच खंडीत केला आहे. महापालिकेच्या या सक्तीच्या कारवाई विरोधात इमारतीमधील रहिवासीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या या अजब कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.

इमारीतमधील रहिवासी अशरफ शेख यांनी सांगितले की, महापालिकेने मालमत्ता कराच्या वसूलीसाठी ही कारवाई केली आहे. मात्र ९० टक्के रहिवासियांनी त्यांचा मालमत्ता कर भरला आहे. १० टक्के रहिवासियांनी मालमत्ता कर भरलेला नाही. त्याची शिक्षा ९० टक्के रहिवासियांना का ? असा संतप्त सवाल रहिवासियांचा आहे. महापालिकेने इमारतीचा पाणी पुरवठा बंद करताना इमारतीमधील रहिवासियांना कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही. ही कारवाई करताना महापालिकेचे अधिकारी त्यांच्यावर दादागिरी करुन त्यांना धमकावित होत असा आरोप करण्यात आला आहे.

सलग सार्वजनिक सुट्ट्या लागून आल्याने बँका बंद होत्या, त्यामुळे काही रहिवाशांना तत्काळ कर भरणे शक्य नव्हते. तरीही अधिकाऱ्यांनी कोणतीही मुभा न देता पाणीपुरवठा बंद केला. रहिवासियांनी सांगितले की, आम्ही नियमित लाखो रुपयांचा कर भरताे. तरी आम्हाला कर चुकविणारे अशी वागणी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा प्रकार आम्हीसहन करणार नाही. पाणी पुरवठा खंडीत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा रहिवासियांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KDMC's unfair action: Water supply cut for 102 due to 10.

Web Summary : Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC) cut water supply to 102 apartments because 10 residents didn't pay property tax. Residents protested this collective punishment, demanding action against responsible officers, threatening road blockades if demands are unmet.
टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका