कल्याण : जलतरणपटू अल्पा जगताप हिला ठाकरे गटाकडून १० हजार रुपयांची मदत

By मुरलीधर भवार | Updated: April 24, 2023 16:37 IST2023-04-24T16:36:53+5:302023-04-24T16:37:09+5:30

अल्पा जगताप हिने एलिफंटा ते कारंजा पाेर्ट हे १८ किलाेमीटरचे अंतर पाच तास ५६ मिनिटात पार केले.

Kalyan Swimmer Alpa Jagtap gets Rs 10 000 help from Thackeray group | कल्याण : जलतरणपटू अल्पा जगताप हिला ठाकरे गटाकडून १० हजार रुपयांची मदत

कल्याण : जलतरणपटू अल्पा जगताप हिला ठाकरे गटाकडून १० हजार रुपयांची मदत

कल्याण-कल्याणमधील जलतरणपटू अल्पा जगताप हिने एलिफंटा ते कारंजा पाेर्ट हे १८ किलाेमीटरचे अंतर पाच तास ५६ मिनिटात पार केले. हे अंतर पार करणारी अल्पा ही पहिलीच जलतरण पटू आहे. तिने हा नवा विक्रम केला आहे. याची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने अल्पा जगताप हिला दहा हजार रुपयांची मदतीचा धनादेश दिला आहे.

काल कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख विजय साळवी यांच्या उपस्थितीत रामबागेतील दत्तमदिर येथे दहा हजाराचा धनादेश सुपूर्द केला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते बाळ हरदास यांच्यासह महिला संघटक विजय पाेटे, शहर प्रमुख सचिन बासरे आदी उपस्थित हाेते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी मानवंदना देण्यासाठी अल्पा जगताप हिने एलिफंटा ते कारंजा पोर्ट अंतर पोहून पार करण्याचा विक्रम केला.या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद ठाणे जिल्हा पंचवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ नाट्यकर्मी शिवाजी शिंदे यांचा प्रचंड मतांनी विजय झालाने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Kalyan Swimmer Alpa Jagtap gets Rs 10 000 help from Thackeray group