शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या मिसेस शिंदेंच्या भेटीला?; चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 18:45 IST

Kalyan Loksabha Election - कल्याण लोकसभा निवडणुकीत सध्या महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर या रिंगणात उतरल्या आहेत. ठाकरे गटाने दिलेल्या या उमेदवारीवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय.

मयुरी चव्हाण काकडे 

कल्याण -  लोकसभा निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं राजकारण अधिकच  रंगतदार होऊ लागलं आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघही  विशेष चर्चेत आला आहे. भाजपा आमदाराच्या पत्नी सुलभा गायकवाड या ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये दिसल्या. आता मात्र कल्याण डोंबिवली मधील ठाकरे गटाच्या अनेक महिला आणि कार्यकर्त्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांची भेट घेतल्याची कुजबुज सुरू झाली आहे. या वृत्ताला ठाकरे गटाकडून नकार देण्यात आला असला तरी शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटातील अनेक जण संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील काही सक्रिय महिला पदाधिकारी या वृषाली यांची भेट घेत असल्याचा एक रिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या एका पदाधिका-याने ही रील व्हायरल केली आहे. यामध्ये या महिला कार्यकर्त्या वृषाली यांच्यासोबत दिसून येत आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्याकडे विचारणा केली असता हा रील मागच्या निवडणुकीची असून आम्ही अशी कोणतीही भेट घेतली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ठाकरे गटातील दोन माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी / कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून भेटी घेत असल्याचं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर लवकरच कल्याण डोंबिवलीत राजकीय धमाका होणार असून अनेकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा होताच अनेक पदाधिकारी यांनी  माजी आमदार सुभाष भोईर यांचे निवासस्थान गाठत राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भातील वृत्तही सर्वात आधी "लोकमत"ने दिले होते. आता ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि वृषाली शिंदे यांचे एकत्रित फोटो व्हायरल होत असल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

टॅग्स :kalyan-pcकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४