Kalyan: ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई

By मुरलीधर भवार | Updated: January 23, 2023 17:58 IST2023-01-23T17:25:54+5:302023-01-23T17:58:29+5:30

Kalyan News: आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोर साहेब मी गद्दार नाही. या आशयाचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने लावण्यात आला होता.

Kalyan: KDMC's action against that banner of Thackeray group | Kalyan: ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई

Kalyan: ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई

- मुरलीधर भवार
कल्याण - आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोर साहेब मी गद्दार नाही. या आशयाचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने लावण्यात आला होता. हा बॅनर कल्याण डोंबिवली महापालिकेने काढला आहे. या प्रकरणात पोलिस गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

या बॅनरवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षात वाद होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची बाजारपेठ पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी महापालिका मुख्यालयाजवळ धाव घेतली. महापालिकेच्या प्रभाग अधिका:यांनी हा बॅनर हटविण्याची कारवाई केली आहे. हा बॅनर आज सकाळपासून महापालिका मुख्यालयासमोर झळकत होता. हा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने लावण्यात आला होता. त्याठिकाणी बॅनरवर पक्षाचा उल्लेख असला तरी पदाधिका:यांचा नामोल्लेख नव्हता.

Web Title: Kalyan: KDMC's action against that banner of Thackeray group