शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
3
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
4
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
5
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
6
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
7
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
8
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
9
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
10
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात अ‍ॅसिड हल्ला; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 11:25 AM

कल्याणमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर ज्वलनशील पदार्थाने हल्ला करुन तिचा लॅपट़ॉप पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे

Crime News : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या एका मुंबईतल्या तरुणीसोबत कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडला. अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीवर कल्याणमध्ये दोन चोरट्यांनी अ‍ॅसिड हल्ला करुन तिचा लॅपटॉप घेऊन पळ काढला.  चोरट्यांनी अंगावर टाकलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे तरुणी जखमी झाली असून तिच्या अंगावरचे कपडे जळाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

कल्याण पूर्वेकडील पार्किंग परिसरात ही घटना घडली असून, आरोपीने तरुणीला एकटी पाहून ज्वलनशील पदार्थ फेकून तिचा लॅपटॉप चोरून नेला. दोन चोरट्यांनी आधी तरूणीवर ज्वलनशील पदार्थ फेकले आणि नंतर तिचा लॅपटॉप लुटला. मुंबईतील अंधेरी भागात राहणारी ही तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. या घटनेत तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी आता तपास सुरु केला आहे. 

तरुणी शनिवारी कल्याण येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी कल्याणमध्ये आली होती. त्यावेळी कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये तरुणी गेली. तिथे अचानक दोन अज्ञात इसमांनी तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला. हल्ल्यानंतर तरुणीने डोळे मिटले मात्र तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ पडल्याने कपडे थोड्याफार प्रमाणात जळाले. पीडित तरुणीने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशनच्या पार्किंग परिसरात आल्यानंतर पुढच्या नाल्याच्या बाजूने तरुणी पुढे जाऊन वळली. त्यानंतर दोन अज्ञात इसमांनी तरुणीच्या अंगावर कास्टिक सोडा फेकला. यामुळे तरुणीच्या अंगाला जळजळ होऊ लागली. ज्वलनशील पदार्थामुळे तिची ओढणी आणि ड्रेस जळाला.यामुळे तिच्या डोळ्यांसमोर अंधारी देखील आली. त्यानंतर आरोपींनी तिची लॅपटॉपची बॅग हिसकावून घेतली आणि तिथून पोबारा केला.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र