Kalyan: कल्याणमध्ये एक मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू अन्य एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:40 IST2022-06-29T08:39:57+5:302022-06-29T08:40:16+5:30
kalyan: कल्याण पश्चिमेकडील रामबाग मेन पवनबारच्या समोर तळ अधिक १ मजला असलेले चाळ टाईप घर कोसळल्याची घटना आज सहाच्या सुमारास घडली .

Kalyan: कल्याणमध्ये एक मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू अन्य एकजण जखमी
कल्याणः येथील पश्चिमेकडील रामबाग परिसरातील एक मजली इमारत कोसळून सुर्यकांत काकड (वय ६०) यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी उषा ( वय ५६) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर केडीएमसीच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या इमारतीत हे दोघेच राहत होते. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मदतकार्यात दोघांनाही बाहेर काढण्यात आले परंतु गंभीर जखमी झालेल्या सुर्यकांत यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या दुर्घटनेत घरातील बोक्याचाही मृत्यू झाला असून मांजरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. इमारत कोसळताना त्याचा भाग बाजुकडील चाळींवर पडल्याने त्यांचे ही नुकसान झाले आहे.