शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

कल्याण : नव्या दुर्गाडी पुलाच्या २ लेन वाहतुकीसाठी खुल्या; वाहतूककोंडीची समस्या काही अंशी मार्गी लागणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 8:21 PM

लोकार्पण सोहळ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ठळक मुद्देलोकार्पण सोहळ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कल्याण : नवीन दुर्गाडी पूल वाहतुकीसाठी कधी खुला केला जाणार ? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून विचारला जात होता. अखेर सोमवारी या पुलाच्या दोन लेनचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन, तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी मार्गी लागणार आहे. 

काही ना काही कारणामुळे नवीन दुर्गाडी पुलाच्या उभारणीसाठी  विलंब होत होता. कल्याणहून भिवंडी, ठाणे आणि विशेषतः मुंबईला जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा समजला जातो. हजारो नागरिक या पुलाचा वापर करतात. मात्र, अस्तित्वात असलेला पूल अपुरा पडू लागल्याने नवीन दुर्गाडी पुल उभारणीचे प्रयोजन केले गेले. दुर्गाडी चौकात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तासनतास नागरिकांना या ठिकाणी थांबावे लागत होते. अखेर नवीन दुर्गाडी पुलाच्या दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असणारा हा प्रकल्प  कल्याणसाठी अतिशय महत्वाचा होता. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. आज यापैकी नव्या २ लेनचे उद्घाटन झाले असून उरलेल्या ४ लेनचे कामही लवकरच होणार असल्याचा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येत्या काळात नागरिकांना ६ नव्या आणि २ जुन्या अशा ८ लेन  वापरायला मिळणार असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आल्याचेही ते म्हणाले. 

सोशल  डिस्टसिंगचा फज्जाया सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सोशल डिस्टसिंगचेही तीन तेरा वाजले होते.  विशेष म्हणजे  केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यामुळे नियम हे सर्व सामान्य लोकांसाठीच आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीEknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे