जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथे जाऊन अफजल खान, खिलजी औरंगजेबाबत प्रवचन द्या; श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

By मुरलीधर भवार | Updated: January 5, 2024 15:32 IST2024-01-05T15:30:13+5:302024-01-05T15:32:46+5:30

आमच्या हिंदुत्वाबद्दल देवदेवतांबद्दल शिकवण्याच्या भानगडीत पडू नये

jitendra awhad went to mumbra and delivered a lecture on afzal khan khilji aurangzeb advice from shrikant shinde | जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथे जाऊन अफजल खान, खिलजी औरंगजेबाबत प्रवचन द्या; श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथे जाऊन अफजल खान, खिलजी औरंगजेबाबत प्रवचन द्या; श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

मुरलीधर भवार, कल्याण-जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथे जाऊन अफजल खान,खिलजी ,औरंगजेबाबत प्रवचन द्यावी ,आमच्या हिंदुत्वाबद्दल देवदेवतांबद्दल शिकवण्याच्या भानगडीत पडू नये असा खोचक सल्ला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.

खासदार शिंदे म्हणाले की, आव्हाड ज्या मतदार संघातून निवडून येतात त्या ठिकाणी असे बोलले नाही तर ते राजकारण करू शकत नाही. राजकारण एकदम खालच्या पातळीवर गेले आहे, अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली .राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचा शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Web Title: jitendra awhad went to mumbra and delivered a lecture on afzal khan khilji aurangzeb advice from shrikant shinde