कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या, दोन जण जखमी

By मुरलीधर भवार | Published: March 19, 2024 08:00 PM2024-03-19T20:00:17+5:302024-03-19T20:00:53+5:30

कल्याण पूर्वेतील जय मल्हार हा’टेलसमोर काही तरुण उभे होते.

In Kalyan, one youth was killed, two others were injured for a trivial reason | कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या, दोन जण जखमी

कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या, दोन जण जखमी

कल्याण- कल्याण पूर्वेत सोमवारी मध्यरात्री रक्तरंजित राडा झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. तरुणांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. शहराच्या पूर्व भागातील चेतना ते आडीवली परिसरात ही घटना घडली आहे. घटनेचे कारण इतके क्षुल्लक होते की, एका तरुणाने दुसऱ््या तरुणाला आवाज देत थांबण्यास सांगितले. तो तरुण आवाज ऐकूनही थांबला नाही. त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पूर्वेतील जय मल्हार हा’टेलसमोर काही तरुण उभे होते. या तरुणांनी पााहिले की, प्रेम भोवाड नावाचा तरुण त्याचा मित्र यश गुप्ता आणि राहूल केणे सोबत जात होता. या तिघांना जनकल्याण खाजगी रुग्णालयात जायचे होते. याच वेळी जय मल्हार हा’टेलसमोर उभे असलेल्या तरुणांनी या तिघांना थांबण्यास सांगितले. तिघेही थांबले नाही. ते रुग्णालयात गेले. रुग्णालयातून ते तिघे पुन्हा त्याच रस्त्याने येत असताना योगेश पटेल याने त्याचा मित्र राहूल पाठक , संतोष यादव यांच्यासह प्रेम आणि यश या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कसेबसे यश गुप्ता हा त्यांच्या तावडीतून सूटून घरी पळाला. योगेश पटेल याने त्याच्या साथीदारांना घेऊन यशचे घर गाठले. घरासमोरच यशच्या छातीत चाकू भोसकला. यावेळी यशचा भाऊ जिगर हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याच्या मानेवारही चाकूने प्रहार करुन त्याला गंभीर जखमी केले. या घटनेत यश गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला आहे. या हाणामारीत आरोपी योगेश पटेल आणि त्याचा साथीदार संतोष यादव हा देखील जखमी झाला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र एका किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या चेतना ते आडीवली परिसर हा वादग्रस्त ठरत आहे. रात्रीच्या वेळी टोळक्यांची या रस्त्यावर गर्दी असते.

Web Title: In Kalyan, one youth was killed, two others were injured for a trivial reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.