कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलीवर प्रसादाचे आमिष दाखवून केला अतिप्रसंग

By मुरलीधर भवार | Updated: January 2, 2024 17:02 IST2024-01-02T17:00:53+5:302024-01-02T17:02:00+5:30

प्रसाद देण्याच्या नावाखाली मुलीला घरात घेऊन गेला. तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला आहे.

In Kalyan, a seven-year-old girl was lured with Prasad | कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलीवर प्रसादाचे आमिष दाखवून केला अतिप्रसंग

कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलीवर प्रसादाचे आमिष दाखवून केला अतिप्रसंग

कल्याण- एका सात वर्षीय मुलीवर एका ५८ वर्षीय व्यक्तीने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी रामलखन यादव याला कोळसेाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. प्रसाद देण्याच्या नावाखाली मुलीला घरात घेऊन गेला. तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला आहे.

कल्याण भागात एक सात वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना या परिसरात राहणारा रामलखन यादव नावाचा व्यक्ती त्या मुलीजवळ आला. मुलगी रामलखन याला आेळखत होती. रामलखन याने त्या मुलाला सांगितले की, चल तुला प्रसाद खायला देतो. प्रसादाचे आमिष दाखवून त्याने तिला घरात नेले. घरात नेऊन मुलीसोबत त्याने अतिप्रसंग केला. घडला प्रकार मुलाने आईला सांगितला. या प्रकरणात आईकडून कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी रामलखन यादव याला अटक केली आहे. रामलखन हा हमालीचे काम करतो. घरात एकटाच राहतो. पोलिसांनी रामलखन याला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रामलखन याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी हेमंत ढोले करीत आहेत.

Web Title: In Kalyan, a seven-year-old girl was lured with Prasad