डीपी रस्त्याच्या आड येणारी बेकायदा इमारत बिल्डरने स्वत:हून पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:27 PM2021-10-05T17:27:49+5:302021-10-05T17:28:15+5:30

सहा मजली पाडकाम प्रकरणात प्रशासन गोत्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर दुमजली बेकायदा इमारत महापालिकेने पाडण्या आधीच बिल्डर व जागा मालकाने पाडली आहे.

The illegal building on DP road was demolished by the builder himself in KDMC | डीपी रस्त्याच्या आड येणारी बेकायदा इमारत बिल्डरने स्वत:हून पाडली

डीपी रस्त्याच्या आड येणारी बेकायदा इमारत बिल्डरने स्वत:हून पाडली

Next

कल्याण-दावडी परिसरातील डीपी रस्त्याच्या आड येणारी बेकायदा इमारत बिल्डर व जागा मालकाने स्वत: हून पाडली आहे. जागा मालक व बिल्डरने उचललेले पाऊल हे चांगले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बेकायदा इमारत दुमजली होती. जी डीपी रस्त्याच्या आड बांधली गेल होती.

कल्याण डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे सुरु केली आहेत. मात्र महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पास गालबोट लावले जात आहे. डीपी रस्त्याच्या आड बेकायदा इमारती उभारल्या जात आहे. या प्रकरणी वास्तू विशारद संदीप पाटील यांनी आवाज उठविला आहे.  दावडीतील डीपी रस्त्याच्या आड येणा:या इमारतीच्या विरोधात पाटील यांनी आवाज उठविला होता.

सहा मजली पाडकाम प्रकरणात प्रशासन गोत्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर दुमजली बेकायदा इमारत महापालिकेने पाडण्या आधीच बिल्डर व जागा मालकाने पाडली आहे. अशा प्रकारे पुढाकार घेऊन स्वत:च  पाडकाम करणा:या जागा मालक व बिल्डरने अधिकृत इमारत बांधकामाचा प्लान महापालिकेकडे मंजूरीसाठी टाकावा. त्याच्या इमारतीचा आराखडा मोफत तयार करुन दिला जाईल असे वास्तू विशारद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: The illegal building on DP road was demolished by the builder himself in KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.