शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

"१५० फूट उंचीवर तिरंगा फडकल्याचा अभिमान वाटतो"; दत्तनगर चौकातील ध्वजाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 1:05 AM

प्रभाग ७६ व ७७चे माजी नगरसेवक राजेश आणि माजी नगरसेविका भारती मोरे यांनी हा ध्वजस्तंभ उभारला आहे

डोंबिवली : पूर्वेतील दत्तनगर चौकात उभारलेल्या १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि ३० बाय २० फूट आकाराच्या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण मंगळवारी प्रजासत्ताकदिनी करण्यात आले. या सोहळ्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत, याचा वेगळाच आनंद, अभिमान आहे. त्याची नोंद इतिहासात होणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.

प्रभाग ७६ व ७७चे माजी नगरसेवक राजेश आणि माजी नगरसेविका भारती मोरे यांनी हा ध्वजस्तंभ उभारला आहे. शहराच्या सांस्कृतिक नगरीत आणखी एक मानाचा तुरा खोवल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू होती. या सोहळ्यानिमित्त २५ जानेवारीपासून दत्तनगर चौक व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ती पाहण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली.ध्वजस्तंभ उभारण्याचे काम केडीएमसीच्या उपअभियंत्या रोहिणी लोकरे, आर्किटेक राजीव तायशेटे, महावितरण अधिकारी व कर्मचारी आदींच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले.  राष्ट्रध्वजाच्या शेजारीच राष्ट्रपुरुषांची अत्यंत सुंदर अशी शिल्पही पूर्वीप्रमाणेच साकारली आहेत. प्रत्येक डोंबिवलीकरांच्या मनातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना आणखीन बळकट होण्याच्या उद्देशाने आपण ही राष्ट्रध्वजाची संकल्पना मांडल्याचेही मोरे यांनी सांगितले.

नियम पाळून जल्लोष करा- सूर्यवंशीडोंबिवली ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असल्याचा प्रत्यय या कार्यक्रमादरम्यान आला. तरुणाईचा जल्लोष, चैतन्य, जोश येथे पाहायला मिळाला. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर अजून काही दिवस काळजी घ्यावी. नियम पाळून जल्लोष व्यक्त करावा, असे आवाहन केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन