कल्याण रेल्वे यार्डातील गोदामाला भीषण आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 19:49 IST2021-05-01T19:48:48+5:302021-05-01T19:49:30+5:30

 कल्याण रेल्वे स्टेशन लगत  "सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन" विभागाच्या साहित्याचे गोडाऊन आहे

A huge fire broke out in the warehouse at Kalyan railway yard | कल्याण रेल्वे यार्डातील गोदामाला भीषण आग 

कल्याण रेल्वे यार्डातील गोदामाला भीषण आग 

 कल्याण - कल्याण  पूर्व रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या यार्डाला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. यार्डात असलेल्या गोदामात वायरआणि इतर असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताचअग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन ही आग लागलीच नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

 कल्याण रेल्वे स्टेशन लगत  "सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन" विभागाच्या साहित्याचे गोडाऊन आहे. शनिवारी  दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास येथून अचानक धुराचे लोट येऊ लागले. सुरवातीला रेल्वेचे कर्मचारी आणि पोलिसांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची व्याप्ती अधिक वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अवघ्या एका तासात अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली. या आगीत केबलच्या वायर व इतर साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: A huge fire broke out in the warehouse at Kalyan railway yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग