Video : शिव सेना नगरसेवकाच्या वाढदिवसाला तोबा गर्दी, बँजोच्या तालावर साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:18 PM2021-03-24T17:18:10+5:302021-03-24T17:18:42+5:30

बँजोच्या तालावर नाचत आणि फटाके फोडत गवळी यांनी उपस्थित असलेल्या तरुणांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

huge crowd on the birthday of Shiv Sena corporator, birthday celebrated on banjo | Video : शिव सेना नगरसेवकाच्या वाढदिवसाला तोबा गर्दी, बँजोच्या तालावर साजरा केला वाढदिवस

Video : शिव सेना नगरसेवकाच्या वाढदिवसाला तोबा गर्दी, बँजोच्या तालावर साजरा केला वाढदिवस

Next

कल्याण/डोंबिवली - संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. मात्र, असे असतानाच लोकप्रतिनिधी मात्र सय्यम बाळगण्याचे नाव नाही. यातच मंगळवारी मध्यरात्री एका शिवसेना नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेकडील चक्की नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. नवीन गवळी, असे या नगरसेवकाचे नाव आहे. (Huge crowd on the birthday of Shiv Sena corporator, birthday celebrated on banjo)



 

बँजोच्या तालावर नाचत आणि फटाके फोडत गवळी यांनी उपस्थित असलेल्या तरुणांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. या सोहळ्यात सोशल डिस्टसिंगचे कसल्याही प्रकारचे पालन करण्यात आले नव्हते. तसेच मास्कचाही वापर यावेळी बघालया मिळाला नाही. विशेष म्हणजे, मोठ्या दणक्यात हे सेलिब्रेशन सुरू असताना पोलीस प्रशासन नेमके काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Read in English

Web Title: huge crowd on the birthday of Shiv Sena corporator, birthday celebrated on banjo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.