रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला परत मिळाली दागिन्याची बॅग

By मुरलीधर भवार | Published: December 20, 2023 08:00 PM2023-12-20T20:00:03+5:302023-12-20T20:01:05+5:30

महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षा चालक मोहन राठोड याचा सत्कार करण्यात आला आहे.

honesty of the rickshaw driver the woman got back the bag of jewels | रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला परत मिळाली दागिन्याची बॅग

रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला परत मिळाली दागिन्याची बॅग

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याणमध्ये एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. रिक्षात एका महिलेने दागिन्याने भरलेली बॅग विसरली होती. रिक्षा चालकाने महात्मा फुले पोलिसांच्या मदतीने ती बॅग त्या महिलेस परत केली आहे. महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षा चालक मोहन राठोड याचा सत्कार करण्यात आला आहे.

ठाण्यात राहणाऱ्या नम्रता देशमुख ही महिला एका लग्न सभारंभात मुरबाडला जाणार होती. त्या आधी त्या आपल्या नातेवाईकाना भेटण्याकरीता कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात जाणार होत्या. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरुन नम्रता यांनी चिकनघरसाठी रिक्षा पकडली त्याच्या जवळ असलेल्या तीन बॅगापैकी एक बॅग रिक्षातील सीटच्या मागे ठेवली. चिकनघर आल्यावर नम्रता दोन बॅग घेऊन खाली उतरला. त्यांना नंतर लक्षात आले की, त्यांची दागिन्याची बॅग रिक्षात विसरल्या आहे. त्या बॅगेत साडे सात तोळे सोन्याचे दागिने होते. त्यानी लगेच महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेस साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनिल मधाळे यांनी सीसीटीव्हीत चेक केला.

या सीसीटीव्हीत रिक्षाचा नंबर सापडला. पोलिसांनी त्वरीत रिक्षा चालकास शोधून काढले. रिक्षा चालकाशी संपर्क साधला असता रिक्षा चालक मोहन राठोड याने प्रामाणिकपणे सांगितले की, ती बॅग रिक्षात आहे. मी ती बॅग महिलेला परत करण्यासाठी शाेधत होतो. या दरम्यान तुमचा फोन आला. मी ही बॅग रिक्षा युनियनच्या कार्यालयात ठेवणार होतो. याची माहिती नम्रता यांना दिली. त्यां ना पोलिस ठाण्यात बोलवून त्यांची बॅग त्यांना सूपुर्द केली. तेव्हा नम्रता यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. महिलने पोलिसांसह रिक्षा चालकाचे आभार मानले आहेत. पोलिसांनी रिक्षाचालकाचा सत्कार केला आहे.

Web Title: honesty of the rickshaw driver the woman got back the bag of jewels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस