गडगडाटासह मुसळधार, अचानक आलेल्या पावसामुळे पादचाऱ्यांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 13:26 IST2022-10-07T13:25:47+5:302022-10-07T13:26:12+5:30
गडगडाट, जोरदार सरींनी शहराला झोडपले

गडगडाटासह मुसळधार, अचानक आलेल्या पावसामुळे पादचाऱ्यांची धावपळ
डोंबिवली: दोन दिवसांपासून आकाश ढगाळलेले असतानाच शुक्रवारी सकाळी 11।30 पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली, अचानक आलेल्या पावसामुळे हमरस्त्यांवर असलेल्या पादचाऱ्यांची गैरसोय झाली.
मानपाडा रस्त्यावर रिक्षाचालकांमुळे देखील गैरसोय झाली होती, परिवहन बस स्टॅण्डवर देखील प्रवाशांना ताटकळावे लागले. ढगांचा गडगडाटासह आलेल्या पावसाच्या जोरदार सरींनी शहराला अर्ध्या तासात झोडपून काढले. सकाळपासून गजबजलेली बाजारपेठ पावसामुळे काहीवेळात शांत झाली. दुपारच्या सत्रात शाळेत।जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पावसामुळे हाल झाले, सहामाही परिक्षेला जाणारे विद्यार्थी बस येण्याची वाट बघत।होते, सकाळच्या सत्रातील मुलांची शाळा सुटल्यावर त्यांची गैरसोय झाली होती.