Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला

By पंकज पाटील | Updated: June 11, 2025 22:45 IST2025-06-11T22:42:51+5:302025-06-11T22:45:32+5:30

Ambernath Local Train news: अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मुंबई महापालिकेचे कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे अंध असून संध्याकाळी ७ च्या सुमारास अंबरनाथहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते.

Heartbreaking! A local train was coming to Ambernath station and a blind man fell directly onto the tracks | Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला

Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला

- पंकज पाटील

अंबरनाथ : प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक अंध व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मुंबई महापालिकेचे कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे अंध असून संध्याकाळी ७ च्या सुमारास अंबरनाथहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले. याचवेळी समोरून कर्जतकडे जाणारी लोकल देखील येत होती. मात्र माने यांना प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते थेट रेल्वे रुळावर कोसळले. 

यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा जवान अमोल देवरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्मवरून रुळांवर उडी मारत दिव्यांगाचे प्राण वाचवले. यावेळी काही प्रवासी देखील त्यांच्या मदतीला धावले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

Web Title: Heartbreaking! A local train was coming to Ambernath station and a blind man fell directly onto the tracks