हृदयद्रावक! वाढदिवशीच झाली अखेर, कारच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 21:58 IST2022-05-20T21:57:59+5:302022-05-20T21:58:19+5:30
Accident News: भरधाव वेगातील कारच्या धडकेत प्रशांत दिलीप मिश्रा हा १४ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केडीएमसीच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात घडली.

हृदयद्रावक! वाढदिवशीच झाली अखेर, कारच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
डोंबिवली - भरधाव वेगातील कारच्या धडकेत प्रशांत दिलीप मिश्रा हा 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केडीएमसीच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलात घडली. याप्रकरणी कारचालक जयेश रविंद्र नेरलेकर (वय 25) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या प्रशांतचा वाढदिवस होता. क्रिकेट खेळत असतानाच ही घटना घडली. प्रशांतचे वडील दिलीप यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून भरधाव वेगात कार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा जयेश विरोधात नोंदविण्यात आला आहे. प्रशांत हा आजदेपाडा परिसरातील साईमाऊली बिल्डींगमध्ये रहायचा. तर आरोपी जयेश हा देखील आजदेगाव परिसरातच राहणारा आहे. ज्याठिकाणी ही घटना घडली ते क्रिडासंकुल केडीएमसीचे आहे. दरम्यान या घटनेमुळे आता मैदानेही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.