त्यांच्या राजीनामा धमकीमुळे मंत्रिपद मिळाले नाही! गोगावले यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 07:12 IST2024-09-24T07:12:16+5:302024-09-24T07:12:23+5:30

अंबरनाथ : तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो, अशी धमकी एका आमदाराने दिल्यामुळेच मला मंत्रिपद मिळू ...

He did not get a ministerial position due to his resignation threat Gogawle targets Shirsat | त्यांच्या राजीनामा धमकीमुळे मंत्रिपद मिळाले नाही! गोगावले यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा

त्यांच्या राजीनामा धमकीमुळे मंत्रिपद मिळाले नाही! गोगावले यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा

अंबरनाथ : तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो, अशी धमकी एका आमदाराने दिल्यामुळेच मला मंत्रिपद मिळू शकले नाही. आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचे अध्यक्षपद दिले, असा गौप्यस्फोट  आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. 
अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित महाड, पोलादपूर, माणगाववासीयांच्या संवाद मेळाव्यात  त्यांनी शिंदेसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिले असून, त्यात मी समाधानी आहे. मी कधीही काहीही मागितलेले नाही. मला आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळणार होते. 

एकाची पत्नी आत्महत्या करणार होती!

एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रिपद मिळाले नाही, तर पत्नी आत्महत्या करील. त्या आमदारासाठी आम्ही मंत्रिपद सोडले. कारण कुणाचे घरदार उद्ध्वस्त व्हायला नको, असे गोगावले म्हणाले.
 

Web Title: He did not get a ministerial position due to his resignation threat Gogawle targets Shirsat