दागिने चोरण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल, पोलिसांनी २४ तासांत लावला छडा; आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:28 PM2021-07-31T17:28:31+5:302021-07-31T17:29:31+5:30

चोरी करण्यासाठी चोर आता एक ना अनेक आयडिया  वापरून त्याचा प्रयोग करू लागले आहेत.

gold robbery in kalyan robber use unique idea to steal jewellery got arrested by police in 24 hours | दागिने चोरण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल, पोलिसांनी २४ तासांत लावला छडा; आरोपी गजाआड

दागिने चोरण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल, पोलिसांनी २४ तासांत लावला छडा; आरोपी गजाआड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

चोरी करण्यासाठी चोर आता एक ना अनेक आयडिया  वापरून त्याचा प्रयोग करू लागले आहेत. ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवुन सोनाराऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचे खोटे मेसेज दाखवुन सोनाराकडून सव्वा चार लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या भामट्याला कल्याण क्राइम ब्रांचने  24 तासात बेड्या ठोकल्यात .विनय लोहिरे अस या भामट्याच नाव आहे.  
       
डोंबिवली पूर्वेकडील नार्वेकर ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका इसम दुकानात आला .सोने खरेदी केल्यानंतर त्याने दुकान मालकाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले असे सांगत खोटा मेसेज दाखवला . मेसेज पाहून दुकानदाराने त्याला जाऊ दिले .मात्र काही वेळाने पैसे ट्रान्सफर न झाल्याने त्याने शहानिशा केली असता या भामट्याने दाखवलेला मेसेज खोटा असल्याचे दुकानदाराचे निदर्शनास आले . हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

दुकानदाराने याबाबत डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली कल्याण क्राइम ब्रांच देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला . अवघ्या चोवीस तासाच्या आत सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे या अंबरनाथ येथून कल्याण क्राइम ब्रांच नाही गजाआड केलं. याआधी देखील विनयवर पुणे व ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत . कल्याण क्राईम ब्राँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  संजीव जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक भूषण दायमा ,  पोलीस उपनिरीक्षक   नितीन मुदगुन,मोहन  कळमकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक  विलास मालशेटे,पोलीस हवालदार-अरविंद पवार,निवृत्ती थेरे,सुरेश निकुळे,दत्‍ताराम भोसले इत्यादी कर्मचारी  या कारवाईत सहभागी होते.

Web Title: gold robbery in kalyan robber use unique idea to steal jewellery got arrested by police in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.