शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

‘एनआरसी’ नावाची सोन्याची द्वारका बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 12:50 AM

कामगारांसाठी मालकाने पाळल्या म्हशी : ६० पैशांत जेवण, १० पैशांत नाश्ता

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : सोन्याची द्वारका आपण पौराणिक कथा, पोथ्यापुराणात वाचली आहे. मात्र, एनआरसी कंपनी व कॉलनीत द्वारकेइतकीच सुबत्ता नव्वदच्या दशकात होती. कामगारांना उच्च प्रतीचे दूध मिळावे याकरिता मालकाने गायी-म्हशी पाळल्या होत्या व डेअरी टाकली होती. कॅन्टीनमध्ये ६० पैशात राइसप्लेट, एक रुपयात मांसाहार, १० पैशांत नाश्ता वर्षानुवर्षे मिळत होता. महिन्याकाठी केवळ दोन रुपये भरुन क्लब हाउसमध्ये टेनिसपासून बिलियर्डपर्यंत सारे खेळ खेळता येत होते. इंग्रजी-मराठी, गुजराती माध्यमाची शाळा, मोफत हॉस्पिटल, घसघशीत पगार आणि बोनस, अशी सगळी सुखे या कॉलनीत पायाशी लोळत होती. एकेकाळी अनेकांनी रेल्वेची सरकारी नोकरी नाकारून एनआरसीची नोकरी पत्करण्यामागे याच सोयीसुविधांचे आमिष होते. परंतु, जशी द्वारका बुडाली तशी एनआरसी बुडाली आणि आज उरली विपन्नता आणि रिकाम्या पोटी सुरू असलेला विलाप.

आंबिवली मोहनेनजीक ४४० एकर जागेवर रसिकलाल चिनॉय यांनी १९४६ साली एनआरसी कंपनीची पायाभरणी केली. कंपनीची उभारणी करण्यास चार वर्षे लागली. १९५० साली कंपनीत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. कंपनीत कापडासाठी धागा तयार केला जात होता. रेयॉन, टायर कोट आणि त्यानंतर नायलॉन तयार होऊ लागले. सुरुवातीला केवळ पाच टनांचे उत्पादन घेतले जात होते. त्यावेळी कंपनीत एक हजार कामगार होते. कंपनी २००९ मध्ये बंद करण्यात आली त्यावेळी कंपनीत ४० टनाचे उत्पादन घेतले जात होते. त्याचबरोबर बारा प्रकारचे बाय प्रॉडक्टस होते. कंपनी बंद पडली तेव्हा कंत्राटी व कायम मिळून ४५०० कामगार होते. चिनॉयकडून ही कंपनी कापडिया यांनी घेतली. त्यानंतर जी. पी. गोयंका यांनी घेतली. कंपनी बंद पडली तेव्हा गोयंका यांचे व्यवस्थापन होते.

कंपनी उत्पादनाकरिता कच्चा माल म्हणून लगदा लागत होता. हा लगदा बांबूपासून तयार होतो. त्याकरिता कंपनीने ३५ एकर जागेवर बांबू प्लॉट विकसित केला होता. त्यात बांबूची शेती केली जात होती. आजही तो परिसर बांबू प्लॉट म्हणून ओळखला जातो. लगद्यासाठी लागणारा कागद हा केरळमधून मागविला जात होता.

nत्याचबरोबर कामगारांसाठी सुसज्ज ६० खाटांचे रुग्णालय होते. मुंबईतील शिवडी सोडले तर टीबी उपचारासाठी स्वतंत्र कक्ष केवळ येथे होता. कंपनीच्या भल्यामोठ्या कॅन्टीनमध्ये एकाचवेळी ६०० पेक्षा जास्त कामगार जेवण घेत. अत्यंत कमी दरात येथे जेवण, नाश्ता मिळायचा. रेशनींगकरिता ग्राहक सोसायटी व गॅस एजन्सी होती. nकंपनीच्या कामगारांचा दिवाळीचा बोनस झाला की, कंपनी परिसरातील दुकानदारांची ‘दिवाळी’ होत असे. गेल्या १० वर्षापासून कंपनीला घरघर लागली आणि ही सोन्याची द्वारका बुडाली.

nकंपनीच्या कामगारांकरिता कामगार वसाहत उभारली होती. त्यात किमान ८०० कामगार आणि अधिकारी रहात होते. तर, अधिकाऱ्यांकरीता बंगले वजा घरे होती. कामगारांच्या मुलांकरिता पहिली ते दहावीपर्यंतची शाळा ही इंग्रजी, मराठी आणि गुजराती माध्यमाची होती. nआजही शाळेची इमारत उभी असून शाळा सुरू आहे. तर, कंपनीच्या क्लब हाउसमध्ये महिन्याकाठी पासकरीता दोन रुपये मोजावे लागत होते. nत्यात इनडोअर गेममध्ये टेबल टेनिस, टेनिस, बास्केटबॉल, बिलियर्ड, पत्ते, कॅरम आदी खेळाच्या सुविधा होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चंगळ होती.