उल्हासनगरात टोळक्याकडून १० गाडयांची तोडफोड, ट्रक चालकाला मारहाण, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:33 IST2025-09-09T18:33:47+5:302025-09-09T18:33:59+5:30
- सदानंद नाईक उल्हासनगर : कॅम्प नं-४, गीता कॉलनी परिसरात एका टोळक्याने मंगळवारी पहाटे ५ वाजता १० पेक्षा जास्त ...

उल्हासनगरात टोळक्याकडून १० गाडयांची तोडफोड, ट्रक चालकाला मारहाण, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४, गीता कॉलनी परिसरात एका टोळक्याने मंगळवारी पहाटे ५ वाजता १० पेक्षा जास्त गाड्याची तोडफोड करून एका ट्रक चालकाला मारहाण झाली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस टोक्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील एका गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत दोन गटात वाद झाला होता. त्यातील एका गटाच्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने, मंगळवारी पहाटे ५ वाजता गीता कॉलनी येथील रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी, कार, रिक्षा व ट्रक अश्या १० पेक्षा जास्त वाहनाची तोडफोड केली. तसेच एका ट्रक चालकाला मारहाण करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सोमवारी अश्याच गाड्याची तोडफोड करणाऱ्या एका गुंडाला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक करून आशेळेगाव परिसरातून धिंड काढली. पोलिसांनी गुंडाची धिंड काढुनही गुन्हेगारावर याचा परिणाम होत नसल्याने, वाहनाची तोडफोडीचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
वाहनाची नुकसान झालेल्या वाहचालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. विठ्ठलवाडी पोलिसांनी गीता कॉलनीत जाऊन, तोडफोड झालेल्या वाहनाची पाहणी केली. तसेच मारहाणीत जखमी झालेल्या ट्रक चालकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वाहनाची तोडफोड करणाऱ्या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे याप्रकरणी तपास करीत असून लवकरच गुन्हेगार जेरबंद होण्याचे संकेत दिले. गोडसे यांनी सोमवारी अश्याच आशेळेगाव येथे वाहनाची तोडफोड करणाऱ्या एका गुंडाला अटक करून त्याची परिसरसातून धिंड काढली होती.