अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार, आराेपींना पाेलिसांनी केली अटक

By मुरलीधर भवार | Updated: April 27, 2023 21:51 IST2023-04-27T21:51:06+5:302023-04-27T21:51:16+5:30

या प्रकरणाचा पुढील तपास पाेलिस करीत आहेत.

Gang rape of minor girl in Kalyan, accused arrested by police | अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार, आराेपींना पाेलिसांनी केली अटक

अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार, आराेपींना पाेलिसांनी केली अटक

कल्याण-एका अल्पवयीन मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बाेलवून तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी तीन जणांना काेळसेवाडी पाेलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील चाैथा आराेपी हा अल्पवयीन आहे. पाेलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. त्याची रवानगी बालसुधार गृहात केली आहे.

पिडीत अल्पवयीन मुलीस साहिल राजभर भेटला. या पिडीत मुलीमुळे त्याची प्रेयसी त्याच्यावर संशय घेते. तू उल्हासनगरला घरी येऊन स्पष्ट कर की आपल्यात तसे काही नाही. या बहाण्याने पिडीत मुलीला गाडीवर बसवून उल्हासनगरला नेले. त्याठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर तिला कल्याण रेल्वे स्टेशनला साेडले. मुलगी या सगळ्या प्रकाराने घाबरली हाेती.

ती घरी गेली नाही. ती तिच्या मैत्रीणीकडे केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा साहिलने तिला फाेन करुन उल्हासनगरला बाेलावून घेतले. साहिल साेबत असलेल्या अन्य तीन जणांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. या प्रकरणी मुलीने काेळसेवाडी पाेलिस ठाण्यात धाव घेतली. पाेलिसांनी पिडीतेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात साहिलसह सुजल गवळी आणि विजय बेरा याला अटक केली आहे. या गुन्ह्यात अन्य एक अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाेलिस करीत आहेत.

Web Title: Gang rape of minor girl in Kalyan, accused arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.