मजा म्हणून अल्पवयीन मुलाने रुळांवर ठेवले होते दगड; मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 03:37 PM2021-08-28T15:37:31+5:302021-08-28T15:41:07+5:30

Railway News : कर्जत मार्गावर जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे ते कृत्य निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या बाबत लगेचच स्थानक प्रशासनाला कळवले.

As fun boy had put stones on rails track in thakurli; Motorman's vigilance averted an accident | मजा म्हणून अल्पवयीन मुलाने रुळांवर ठेवले होते दगड; मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला 

मजा म्हणून अल्पवयीन मुलाने रुळांवर ठेवले होते दगड; मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला 

Next

डोंबिवली - सहज मजा म्हणून मुलांनी रेल्वे रुळांवर छोटे दगड ठेवल्याची घटना ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी संध्याकाळी घडली. कर्जत मार्गावर जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे ते कृत्य निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या बाबत लगेचच स्थानक प्रशासनाला कळवले. त्यामुळे पुढील अपघात टळला असला तरी हे कृत्य करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यासोबत आणखी कोण होते याबाबतची चौकशी सुरू आहे. 

यासंदर्भात पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्टेशन दरम्यान किमी ४८/७० डाऊन दिशेकडे धीम्या मार्गावर काही लहान दगड ठेवले होते, ते दगड सतर्कपणे रेल्वे कर्मचार्यांनी बाजूला केले असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आरपीएफ पोलिसांसमवेत घटनास्थळाजवळ तपास सुरू केला. परंतु त्यावेळी काहीएक माहिती न मिळाल्याने नमूद पोलीस अंमलदार पोलीस ठाण्यात येऊन त्याच दिवशी रात्री ८.१५ वा माहिती कळवली. त्यानुसार मोटरमनने त्या घटनेबाबत माहिती नियंत्रण कक्षात कळवली व डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नमूद घटनेच्या अनुषंगाने गोपनीय शाखेचेतर्फे अज्ञात इसमा विरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला. 

पुढील तपासादरम्यान पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमाराश सीसीटीव्ही फुटेजद्वारे एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेत पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्या तपासादरम्यान त्याची आई देखील पोलिसांच्या संपर्कात आली असून तिला सगळी माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या मुलाला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती ढगे यांनी दिली. त्यात आणखी एक सहकारी असल्याचे सांगण्यात आले, पण त्याचा काही शोध लागला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले, त्यामुळे आणखी कोणी आहे की नाही हे आताच सांगता येणार नसल्याचे सांगण्यात आले. 
 

Web Title: As fun boy had put stones on rails track in thakurli; Motorman's vigilance averted an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.