कल्याणच्या माजी स्वातंत्र्य सैनिकाने गाठली वयाची शंभरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:03 IST2026-02-09T22:02:24+5:302026-02-09T22:03:40+5:30

...सैन्यदलाची मिळणारी पेन्शन त्यांनी भारतीय सैन्य कल्याण निधीला अर्पण केली. सैन्यदलाच्या मिळणाऱ्या कोणत्याही सेवा सुविधा त्यांनी स्विकारल्या नाहीत. त्याचा फायदा कुटुंबातील एकाही सदस्याने घेतला नाही. 'मी देशासाठी लढलो आपल्या फायद्यासाठी नाही,' असे ते स्वाभिमानाने आजही सांगतात.

Former freedom fighter from Kalyan turns 100 | कल्याणच्या माजी स्वातंत्र्य सैनिकाने गाठली वयाची शंभरी

कल्याणच्या माजी स्वातंत्र्य सैनिकाने गाठली वयाची शंभरी

 मुरलीधर भवार -

कल्याण : आजकालच्या धावपळीच्या जीवनात माणसाचे आयुष्य कमी झाले आहे. मात्र कल्याणचे माजी स्वातंत्र्य सैनिक विजयकुमार पाटील यांनी वयाची शंभरी गाठली आहे. त्यानिमित्त त्यांची श्यामची आई या पुस्तकाने तुला केली जाणार आहे. हा कार्यक्रम कोळसेवाडी परिसरातील गणेश विद्यामंदिर शाळेसमोर सायंकाळी साडे पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. विजयकुमार हे उद्धव सेनेचे विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांचे वडील आहेत.

विजयकुमार यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावी झाला .स्वातंत्र्य काळात नंदुरबार येथे चले जाव चळवळीत शिरीष कुमार मेहता या सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याला इंग्रजांकडून गोळीबारात हौतात्म प्राप्त झाले. त्याचे पडसाद संपूर्ण धुळे जिल्ह्यात उमटल्याने बोरविहिर येथे विजयकुमार यांनी गावात प्रभात फेरी काढून ब्रिटिश सरकार विरोधात गोळीबाराचा निषेध व्यक्त केला . त्यात त्यांना गावाच्या चावडीवर आणून प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या आई-वडिलांना देखील धुळे तालुक्याच्या कचेरीमध्ये डाबुंन ठेवण्यात आले . त्यामुळे देशभक्तीचे आणि मातृभुमी बाबत प्रेम पहिल्या पासूनच त्यांच्या मनामध्ये रुजले गेले.

पुढे ते स्वातंत्र्यानंतर १९४९ साली भारतीय सैन्य दलात भरती झाले. तत्कालीन संरक्षण मंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी खालसा चळवळ सुरू केली . त्यात निजाम संस्थान संघराज्यात विलीन करण्यास निजाम तयार नव्हता. न सैन्य दल पाठवून निजाम संस्थान संघराज्यात सहभागी करण्यासाठी झालेल्या गोळीबारात निजाम सैन्याची गोळी विजयकुमार यांच्या मांडीला लागल्याने ते जखमी झाले. पुढे त्यांना मेडिकल अनफिट म्हणून भारतीय सैन्य दलातुन मुक्त व्हावे लागले. सैन्यदलाची मिळणारी पेन्शन त्यांनी भारतीय सैन्य कल्याण निधीला अर्पण केली. सैन्यदलाच्या मिळणाऱ्या कोणत्याही सेवा सुविधा त्यांनी स्विकारल्या नाहीत. त्याचा फायदा कुटुंबातील एकाही सदस्याने घेतला नाही. 'मी देशासाठी लढलो आपल्या फायद्यासाठी नाही,' असे ते स्वाभिमानाने आजही सांगतात.

ज ही १०० व्या वर्षात स्वत:ची दैनंदिन कामे स्वतःच करतात. या वयात त्यांना अद्याप चष्मा लागलेला नााही. शिस्तबद्ध आणि स्वाभिमान त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Web Title : कल्याण के स्वतंत्रता सेनानी ने मनाई शताब्दी, पुस्तक से तुलादान।

Web Summary : कल्याण के वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी विजयकुमार पाटिल 100 वर्ष के हुए। देशभक्ति के लिए सम्मानित, उन्होंने निज़ाम मुक्ति संग्राम में लड़ाई लड़ी और सैन्य लाभों को अस्वीकार कर दिया, जो आत्मनिर्भरता का प्रतीक है।

Web Title : Kalyan's freedom fighter celebrates centenary, honored with book weighing.

Web Summary : Kalyan's veteran freedom fighter Vijaykumar Patil turns 100. Honored for patriotism, he fought in the Nizam liberation and declined military benefits, embodying self-reliance.

टॅग्स :kalyanकल्याण