कल्याणमध्ये उंच इमारतीला भीषण आग; तीन मजल्यांवर पसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 20:39 IST2023-11-15T20:36:33+5:302023-11-15T20:39:37+5:30
अद्याप जिवीत हानीची माहिती नसून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

कल्याणमध्ये उंच इमारतीला भीषण आग; तीन मजल्यांवर पसरली
दिवाळीनिमित्त फटाके आणि लायटिंग यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असे असताना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या बाजुलाच असलेल्या उंच इमारतीला भीषण आग लागली आहे.
इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली असून ही आग वरच्या मजल्यासह आजुबाजुच्या घरामध्येही पसरली आहे. जवळपास तीन ते चार मजल्यांवर ही आग पसरली आहे.
कल्याणमध्ये खडकपाडा पोलीस ठाण्याच्या बाजुच्या इमारतीला भीषण आग pic.twitter.com/n9O4kfaJBQ
— Lokmat (@lokmat) November 15, 2023
अद्याप जिवीत हानीची माहिती नसून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.