सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण; सेंटरची नोंदणी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:49 IST2026-03-07T04:48:40+5:302026-03-07T04:49:08+5:30

बदलापूर येथील स्त्रीबीज प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेने शहरातील सोनोग्राफी व इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.

Filming of women coming for sonography; Center's registration cancelled | सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण; सेंटरची नोंदणी रद्द

सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण; सेंटरची नोंदणी रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर/बदलापूर : सोनोग्राफीसाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण केल्याचा प्रकार उल्हासनगर येथील कॅम्प नं. ५ मधील भगवान हॉस्पिटलमध्ये उघड झाला आहे. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने सेंटरचा परवाना तांत्रिक कारणावरून रद्द केला. सोनोग्राफी मशीन हाताळणारी महिला अप्रशिक्षित असल्याचेही स्पष्ट झाले असून, बदलापूर पोलिसांनी तिला अटक केली.

बदलापूर येथील स्त्रीबीज प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेने शहरातील सोनोग्राफी व इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. भगवान हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटरची तपासणी गेल्या आठवड्यात करण्यात आली. त्यात सोनोग्राफी मशीनचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले. सोनोग्राफी मशीन हाताळणाऱ्या अप्रशिक्षित महिलेने महिलांचे ३० सेकंदांचे चित्रीकरण केल्याचे तपासात उघड झाले. 

साेनोग्राफी सेंटर अखेर सील
आरोग्य विभागाकडून सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले असून, कलम २०(२) अन्वये सेंटरची नोंदणी रद्द केली आहे. सेंटरचा संबंध बदलापूरच्या प्रकरणाशी उघड झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी सांगितले. 

तपासात कोणती माहिती उघड?
उल्हासनगरमधील सोनोग्राफी सेंटरमधून अटक केलेली सोनल गरेवार ही बदलापूर येथील टोळीला महिलांचे ३० सेकंदाचे चित्रीकरण करून पाठवायची, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. स्त्री बीज प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title : महिलाओं की अवैध रिकॉर्डिंग के बाद उल्हासनगर सोनोग्राफी सेंटर सील

Web Summary : उल्हासनगर के भगवान अस्पताल का सोनोग्राफी सेंटर महिलाओं की अनाधिकृत रिकॉर्डिंग के बाद सील कर दिया गया। एक अप्रशिक्षित ऑपरेटर ने मरीजों का फिल्मांकन किया, क्लिप बदलापुर से जुड़े एक समूह को भेजे। केंद्र का पंजीकरण रद्द; ऑपरेटर गिरफ्तार। मामले में अब तक सात गिरफ्तार।

Web Title : Ulhasnagar Sonography Center Sealed After Illegal Filming of Women

Web Summary : Ulhasnagar's ভগবান Hospital's sonography center was sealed after unauthorized filming of women was discovered. An untrained operator filmed patients, sending clips to a Badlapur-linked group. The center's registration was revoked; operator arrested. Seven people have been arrested in connection to the case so far.