उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:21 PM2021-02-12T22:21:38+5:302021-02-12T22:21:51+5:30

जागरुक नागरीक मंचाची मागणी, पोलिस ठाण्यात दिली तक्रार

File charges against the officials responsible for the Ulhas River pollution case | उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा

उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा

Next

कल्याण-उल्हास नदी प्रदूषण करणा:यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात सरकारी यंत्रणा मूग गिळून बसल्या आहेत. प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष करणा:या अधिका:यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी जागरुक नागरीक मंचाच्या वतीने करण्यात करण्यात आली आहे.


जागरुक नागरीक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्या पुढाकाराने खडकपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आवारे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी जागरुक नागरीक मंचाच्या संजिता नायर, वंदना सोनवणे, राणी कपोते, माजी नगरसेवक कैलास शिंदे, विवेक कानडे हे उपस्थित होते. नदी ही लाखो लोकांची तहान भागविते. या नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असणा:या विरोधात ठोस कारवाई केली जात नाही. नदी प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय हरीत लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट अहे.

न्यायालयाने आणि लवादाने प्रदूषण रोखण्यासंदर्भात संबंधित सरकारी यंत्रणांना आदेश दिले आहे. मात्र सरकारी यंत्रणा ठोस उपाययोजना करीत नाही. हा सर्व प्रकार मानवी जीवनाशी खेळ करणारा आहे. तसेच पर्यावरण सवंर्धन कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. अधिकारी काही एक दाद देत नाही.  हा सगळा प्रकार पोलिस ठाण्यात अंतर्गत येत असल्याने पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जागरुक नागरीक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
 

Web Title: File charges against the officials responsible for the Ulhas River pollution case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.