"Even if Raj Thackeray comes, you ...", MNS slapped the employee of the finance company | "राज ठाकरे जरी आले तरी तुम्हाला...", फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसेने दिला चोप

"राज ठाकरे जरी आले तरी तुम्हाला...", फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसेने दिला चोप

ठळक मुद्देकल्याण काटेमानीवली परिसरात आर. एल. बी. फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून एका महिलने काही लोन घेतले होते.

कल्याण : कल्याण पूर्व भागातील आर. एल. बी. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने एका महिलेशी उद्धट वर्तन करीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी चुकीचे विधान केले होते. हा प्रकार कळताच मनसेच्या कार्यकार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला आणि त्याला माफी मागण्यास भाग पाडले. ही घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेचा व्हिडीओ मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकून चांगलाच व्हायरल केला आहे. (MNS supporters slapped the employee of the finance company in kalyan)

कल्याण काटेमानीवली परिसरात आर. एल. बी. फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून एका महिलने काही लोन घेतले होते. तिच्या लोनचे हप्ते शिल्लक असल्याने कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी अनिल भोगे याच्याशी तिने संपर्क साधला. त्यावेळी भोगे याने महिलेशी चुकीच्या भाषेत संवाद साधला, उद्धट वर्तन केले. तसेच, मनसेचे प्रमुख राज ठाकरे जरी आले तरी तुम्हाला लोनचा हप्ता द्यावाच लागेल, अशी भाषा वापरली. 

हा प्रकार मनसेचे पदाधिकारी उदय वाघमारे यांना कळला. त्यानंतर त्यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीचे कार्यालय गाठले. राज ठाकरे यांच्याविरोधात विधान करणाऱ्या भोगेला चांगलाच जाब विचारुन त्याला चोप दिला. तसेच, उठा बशा काढायला लावून माफी मागण्यास भाग पाडले. 

Web Title: "Even if Raj Thackeray comes, you ...", MNS slapped the employee of the finance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.