एमएमआर रिजनसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:43 PM2021-01-25T18:43:28+5:302021-01-25T18:44:26+5:30

Aditya Thackeray News : एमएमआर रिजनच्या विकासासाठी एक मास्टर प्लॉन तयार केला जात असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

Environment Minister Aditya Thackeray informed that work is underway to prepare a master plan for MMR region | एमएमआर रिजनसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

एमएमआर रिजनसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

googlenewsNext

कल्याण - एमएमआर रिजनच्या विकासासाठी एक मास्टर प्लॉन तयार केला जात असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिली.
स्मार्ट सिटी कल्याम स्टेशन परिसर विकासाचे भूमीपूजन सोहळ्य़ानिमित्त उपस्थित असलेल्या पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी उपरोक्त माहिती दिली. ठाकरे यांनी सांगितले की, कोणत्याही शहराचा विकास करताना. शहरे स्मार्ट करीत असताना नागरीकांना नेमक्या कोणत्या प्रकारचा विकास अपेक्षित आहे. हे जाणून घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक, विविध क्षेत्रतील जाणकर, विविध समाजिक संस्था  यांचे अभिप्राय जाणून घेऊन एक विकासाचा प्लान एमएमआर रिजन करीता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तयार केला जात आहे. ज्या प्रकारे नॉन गव्र्हमेंट संस्था काम करतात.  त्या प्रकारे एक को-गव्र्हमेंट तयार करुन नागरीक आणि सरकार यांच्यात विकासाकरीता समन्वय या माध्यमातून साधला जाणार आहे.

अजिंक्य रहाणेचा नागरी सत्कार करण्याची सूचना
डोंबिवली हे माझे आजोळ आहे. त्यामुळे मला कल्याण डोंबिवली विषयी प्रेम आहे. डोंबिवलीत अजिंक रहाणो राहत होते. त्यांचा नागरी सत्कार पालकमंत्र्यांनी डोंबिवलीत आयोजित करावा अशी सूचनाही ठाकरे यांनी यावेळी केली.

Web Title: Environment Minister Aditya Thackeray informed that work is underway to prepare a master plan for MMR region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.