डोंबिवलीत पिंपळाचे झाड पडल्याने वीज पुरवठा खंडीत 

By अनिकेत घमंडी | Updated: May 13, 2024 20:10 IST2024-05-13T19:04:30+5:302024-05-13T20:10:33+5:30

दुपारी साडेतीन वाजल्यापासून वीज खंडीत झाली होती.

Electricity supply interrupted due to fall of pimpal tree in Dombivli | डोंबिवलीत पिंपळाचे झाड पडल्याने वीज पुरवठा खंडीत 

डोंबिवलीत पिंपळाचे झाड पडल्याने वीज पुरवठा खंडीत 

डोंबिवली: सोसाट्याचा वारा आणि त्यासोबत आलेल्या पावसाच्या गोंधळात सोमवारी पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात पिंपलाचे झाड पडल्याने महावितरणची वीज पूर्वेला ठिकठिकाणी खंडित झाली असल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली. गणेश मंदिर, बाजीप्रभू चौक, रामनगर, टाटा लेन या ठिकाणचे फिडरवरील ग्राहक त्यामुळे बाधित झाल्याचे सांगण्यात आले.

दुपारी साडेतीन वाजल्यापासून वीज खंडीत झाली होती, चार तासांनी संध्याकाळी साडेसात वाजेदरम्यान।काम।झाले तर वीज पुरवठा सुरळीत होईल असेही सांगण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हजारो ग्राहक हैराण झाले असून बाहेर पावसाचा चिखल आणि घरात अंधार अशी स्थिती झाल्याने नागरिकांची पंचाईत झाली

Web Title: Electricity supply interrupted due to fall of pimpal tree in Dombivli