श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ला पाच हजार दिव्यांनी उजळून निघणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 17:13 IST2024-01-20T17:12:36+5:302024-01-20T17:13:25+5:30

शिवसेनेचा उपक्रम.

Durgadi Fort will be lit up with 5000 lights on the occasion of shri ram murti pran installation | श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ला पाच हजार दिव्यांनी उजळून निघणार

श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ला पाच हजार दिव्यांनी उजळून निघणार

मुरलीधर भवार, कल्याण : अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. कल्याण शहर देखील त्यामध्ये मागे नाही कल्याण शहरात देखील विविध संस्थांनी राजकीय पक्षाने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने २२ तारखेला दुर्गाडी किल्ल्यावर संध्याकाळी सहा वाजता दिप महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तब्बल पाच हजार दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळून निघणार आहे. कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक ,आंबिवली ,टिटवाळा ,वडवली ,मोहना गेट , विविध ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले.

Web Title: Durgadi Fort will be lit up with 5000 lights on the occasion of shri ram murti pran installation