कल्याण रेल्वे स्थानकात मद्यपीनं महिलेशी केले अश्लील चाळे; प्रवाशांनी दिला चोप

By मुरलीधर भवार | Updated: September 27, 2023 22:15 IST2023-09-27T22:14:48+5:302023-09-27T22:15:16+5:30

या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षितेतचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

Drunken man sexually assaulted woman at Kalyan railway station in kalyan | कल्याण रेल्वे स्थानकात मद्यपीनं महिलेशी केले अश्लील चाळे; प्रवाशांनी दिला चोप

कल्याण रेल्वे स्थानकात मद्यपीनं महिलेशी केले अश्लील चाळे; प्रवाशांनी दिला चोप

कल्याण-कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर एका मद्यपीने प्रवासी महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार आज सायंकाळी घडला आहे. या मद्यपीला अन्य प्रवाशांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षितेतचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

प्रवाशांनी त्याला चोप देऊन रेल्वेपोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्याकरीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविले आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. महिला तक्रार देण्यास पुढे आली नाही. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणात पुढाकार घेतला जात नव्हता. त्यावेळी अन्य प्रवाशांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरल्यावर पोलिस पुढील कार्यवाहीस लागले आहेत.

यापूर्वी पहाटेच्या सुमारास रेल्वे पादचारी पूलावर एका तरुणीला नशाबाज गर्दूल्ल्याने मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्या घटनेनंतर मनसे रेल्वे पोलिस आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. अधिकाऱ््यांना बांगड्याचा आहेर दिला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्टेशन परिसरातील नशाबाज गर्दूल्ले यांची धरपकड केली होती. आज पुन्हा मद्यपीने महिला प्रवाशासोबत केलेल्या अश्लील कृत्याच्या घटना घडली आहे.
 

Web Title: Drunken man sexually assaulted woman at Kalyan railway station in kalyan