मद्यधुंद कारचालकाने पादचारी, दुचाकीस्वारांसह वाहतूक पोलिस चौकीलाही उडविले

By मुरलीधर भवार | Updated: February 8, 2024 18:29 IST2024-02-08T18:28:15+5:302024-02-08T18:29:18+5:30

कार चालक बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

drunken driver blew up pedestrians cyclists and even a traffic police post | मद्यधुंद कारचालकाने पादचारी, दुचाकीस्वारांसह वाहतूक पोलिस चौकीलाही उडविले

मद्यधुंद कारचालकाने पादचारी, दुचाकीस्वारांसह वाहतूक पोलिस चौकीलाही उडविले

मुरलीधर भवार, कल्याण-कल्याण भिवंडी मार्गावर मद्यधुंद कार चालकाने सात ते आठ पादचाऱ््यांना धडक देऊन जखमी केले आहे. अनेक गाड्यांचे नुकसान केले आहे. या मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिस चौकीसही जोराची धडक दिली आहे. सागर जोहरे नामक या कार चालकास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी पाच वाजताच्या सुमारास भिवंडीहून कल्याणच्या दिशेने एक कार भरधाव चालविली जात होती. कार चालकाने अनेक गाड्यांना जोराची धडक दिली. रस्त्यावर चालणाऱ्या पादचारी आणि बाईक चालकाना धडक दिली. या धडकेत सात ते आठ जण जखमी झाले आहे. मद्यधुंद कार चालकाने वाहतूक पोलिस चौकीस ठोकली. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि ट्र’फिक वार्डन धीरज सोनवणे यांनी त्वरीत कार चालकास ताब्यात घेतले. कार चालकाला जमावाने घेरले होते. कसेबसे पोलिसांनी त्याला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले. काही वाहन चालक बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. मात्र ही घटना कोनगाव आणि खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या पैकी एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होणार आहे. चालकास वैद्यकीय तपासणीकरीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
 

Web Title: drunken driver blew up pedestrians cyclists and even a traffic police post

टॅग्स :Accidentअपघात