शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
2
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
3
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये जवानांच्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा, पाकिस्तानी घुसखोरही अटकेत
4
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
5
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार
6
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
7
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...
8
घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर
9
Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’
10
१०० रुपये ते ५० कोटींचा मालक... शुभमन गिल क्रिकेटशिवाय 'या' २० ठिकाणांहून कमवतो बक्कळ पैसा
11
मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
12
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
13
उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
14
'नेटवर्क्ड ब्लू वॉटर फोर्स'..! २०० हून अधिक युद्धनौका, पाणबुड्यांसह भारतीय नौदलाचा जबरदस्त प्लॅन
15
आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा!
16
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
17
...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका
18
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
19
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
20
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?

ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'

By संतोष कनमुसे | Updated: July 23, 2025 08:57 IST

Kalyan Receptionist Girl Beaten: कल्याणमध्ये काल मंगळवारी एका रुग्णालयात मराठी तरुणीला परप्रांतीय युवकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. काल रात्री उशीरा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Kalyan Girl Assault: कल्याणमध्ये काल मंगळवारी एका रुग्णालयात मराठी तरुणीला परप्रांतीय युवकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. काल रात्री उशीरा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना

डॉक्टरांनी दिली अपडेट

डॉक्टरांनी तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोईन शेख यांनी सांगितले की,तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. ⁠तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. तसेच तरुणीला मान हलवताना खूप वेदाना होत आहे. या मारहाणीमुळे तिला पॅरालिसीस होण्याची शक्यता आहे. तरुणीला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.  

आरोपीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी शोधला

मनसेच्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा या आरोपीला नेवाळी नाका येथे दिसला.  यावेळी त्यांनी त्याच्याकडे गेले तेव्हा झा पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. ते मनसेच्या कार्यकर्त्यांना आरोपी तोच असल्याचे पटले. त्यांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. 

तरुणीने काय सांगितलं?

काल मारहाण झालेल्या तरुणीने सर्व घटनाक्रम सागितला. "मी बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. हा इसम अनन्या झा नावाच्या रुग्णाबरोबर आला होता. मी पहिल्यांदाच त्याला इथे पाहिले. तो आतमध्ये जाण्यासाठी खूप घाई करत होता. मी त्याला एवढंच बोलले की, तुमचा सध्या नंबर नाहीये, तुम्ही १० मिनिटे वाट बघा. तर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ केल्यानंतर मी ही व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने बोलत नाही आहे, असे आमच्या सरांना सांगितले.. मी त्याला असेही सांगितले की तू माझ्याशी नीट बोल. तर तो माणूस माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि त्यानंतर माझे केस पकडून दरवाजापर्यंत मला खेचत खेचत नेले. मला त्यांनी एवढे मारलं की माझा श्वासही थोड्या क्षणांसाठी थांबला होता. 

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याची मागणी होत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी भाषेवरुन वाद पेटला आहे.  आता यातच परप्रांतीय तरुणाने मराठी तरुणीला मारहाण केल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित होत आहे. ( Crime News )

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणMNSमनसेmarathiमराठीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल