अमोल शिंदेने कल्याणमधून ‘स्मोक कॅन’ केले खरेदी? स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 05:44 IST2023-12-16T05:42:39+5:302023-12-16T05:44:12+5:30

दिल्लीत संसदेत घुसून स्मोक कॅन जाळून गोंधळ उडवून देणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदेने कल्याणमधून स्मोक कॅन खरेदी केल्याचे सांगितले जाते.

Did Amol Shinde buy 'Smoke Can' from Kalyan? Local police are investigating | अमोल शिंदेने कल्याणमधून ‘स्मोक कॅन’ केले खरेदी? स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू

अमोल शिंदेने कल्याणमधून ‘स्मोक कॅन’ केले खरेदी? स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू

कल्याण : दिल्लीत संसदेत घुसून स्मोक कॅन जाळून गोंधळ उडवून देणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदेने कल्याणमधून स्मोक कॅन खरेदी केल्याचे सांगितले जाते. तपास यंत्रणाच्या चौकशीदरम्यान कल्याण कनेक्शन समोर आले आहे. या दृष्टीने स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

शहरातील फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे स्थानिक पोलिसांनी चाैकशी केली. मात्र पोलिसांकडे याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती प्राप्त झालेली नाही.  कल्याणच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता दिल्लीतील तपास यंत्रणांनी अशी कोणतीही माहिती आम्हाला कळविलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Did Amol Shinde buy 'Smoke Can' from Kalyan? Local police are investigating