दिव्यात रेल्वे रूळ ओलांडताना अज्ञाताचा मृत्यू; अद्याप ओळख अस्पष्ट
By अनिकेत घमंडी | Updated: May 30, 2024 16:51 IST2024-05-30T16:47:11+5:302024-05-30T16:51:03+5:30
ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

दिव्यात रेल्वे रूळ ओलांडताना अज्ञाताचा मृत्यू; अद्याप ओळख अस्पष्ट
अनिकेत घमंडी,डोंबिवली: आठ महिन्यात शून्य अपघाताची नोंद असलेल्या दिवा स्थानकाजवळ गुरुवारी रेल्वे रूळ ओलांडताना एका ३५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अप, डाऊन दोन्ही दिशांहून एका वेळी रेल्वे गाड्या आल्याने त्या गोंधळात अडकलेल्या एका पुरुषाचा रूळ ओलांडण्याचा नादात अपघाती मृत्यू झाला. त्याची ओळ्ख अद्याप पटली नसून अज्ञात व्यक्तीचा रेल्वे अपघाती मृत्यू अशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वारशाचा पोलीस तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेने रूळ क्रॉसिंग बंद करण्यासाठी रेल्वे फाटक बंद केले, त्यामुळे गेल्या आठ महिन्यात एकही अपघात त्या ठिकाणी झाला नसल्याने रेल्वेने समाधान व्यक्त केले होते. त्या धाडसी निर्णयाबद्दल रेल्वेचे दिवा प्रवासी संघटनेने कौतुक केले होते.