डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा ‘तो’ किसिंग सीन व्हायरल, आता जीआरपीनं केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:55 IST2022-03-11T15:55:09+5:302022-03-11T15:55:29+5:30
डोंबिवलीत आता असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा ‘तो’ किसिंग सीन व्हायरल, आता जीआरपीनं केला गुन्हा दाखल
डोंबिवली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या गर्दीत प्लॅटफॉर्म वरच एक तरुण तरुणी रोमांस करत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याप्रकरणी डोंबिवली जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे. तसंच आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. हा रोमान्स पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. काही केल्या तरुण तरुणीचे अश्लील चाळे काही थांबत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. डोंबिवलीत आता असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.
साधारण दुपारची वेळ. डोंबिवली रेल्वे स्टेशन तस ब-यापैकी गजबजलेलं होतं. मात्र त्या दोघांना कसलचं भान राहीलं नव्हतं. भर गर्दीत महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा रोमांस सुरू झाला. हा रोमान्स पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. काही केल्या तरुण तरुणीचे अश्लील चाळे काही थांबत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.