अरे देवा! डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा रोमांस; ‘तो’ किसिंग सीन व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 14:43 IST2022-03-07T14:43:02+5:302022-03-07T14:43:27+5:30
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं डोंबिवली शहर वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालंय.

अरे देवा! डोंबिवली रेल्वे स्टेशनवरच कपलचा रोमांस; ‘तो’ किसिंग सीन व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं डोंबिवली शहर वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालंय. आता येथील रेल्वे स्टेशनवरच भर माणसांच्या गर्दीत तरुणाईचं प्रेम फुलू लागल्यानं संताप व्यक्त होतोय.
फोटो मधील दिसणारं हे चित्र काही परदेशातील नाही. तर हे दृश्य आहे आपल्या मराठमोठया डोंबिवलीतमधलं. साधारण दुपारची वेळ. डोंबिवली रेल्वे स्टेशन तस ब-यापैकी गजबजलेलं होतं.मात्र त्या दोघांना कसलचं भान राहीलं नव्हतं. भर गर्दीत महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा रोमांस सुरू झाला. हा रोमान्स पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. काही केल्या तरुण तरुणीचे अश्लील चाळे काही थांबत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या डोंबिवलीत आता असे प्रकार पण खुल्लम खुला होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.