शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीत वीकेंड लॉकडाऊन; केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 20:27 IST

CoronaVirus News: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

कल्याण-डोंबिवली: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने हळूहळू निर्बंधही वाढवण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. उद्याच्या शनिवारपासून या आदेशांची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Weekend lockdown imposed in kalyan dombivali after corona cases increased)राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय या आठवड्यात कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या आकड्यांनी दररोज नवनविन रेकॉर्ड केले आहेत. कोरोना संख्येत अचानक झालेली ही वाढ पाहता केडीएमसी प्रशासनानेही त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यासह हॉटेल - बार आणि रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी एलएनएनशी बोलताना दिले आहेत. तसेच मॉल्सलाही सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून नियमांचे उल्लंघन किंवा गर्दी झाल्यास मॉल सील केला जाईल असा इशाराही पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिला. "लोक सांगूनही ऐकत नाहीत, मग लॉकडाऊन हाच पर्याय", छगन भुजबळांनी दिला अल्टिमेटम

होळी-रंगपंचमीसाठी पथक तैनातदरम्यान वाढत्या कोरोना आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यालाही मनाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात 4-5 पथके तैनात करण्यात येणार असून या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचाही पुनरुच्चार आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना केला. 

केवळ या सेवा राहणार सुरू-अत्यावश्यक सेवा, मनुष्य आणि प्राण्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल, वैद्यकीय सेवा, किराणा दुकाने, दूध डेअरी, वृत्तपत्रे आणि पेट्रोल पंप 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या