शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त विधान भोवलं; मृणाल जाधव हिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 21:02 IST

२७ फेब्रुवारी रोजी जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर टाकला होता.

मुरलीधर भवार

कल्याण - बदलापूरात राहणारी तरुणी मृणाल जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता. या प्रकरणी तिने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव हिचा जामीन अर्ज फेटालून लावला आहे. त्यामुळे जाधव हिचा मुक्काम आधारवाडी कारागृहात राहणार आहे.

२७ फेब्रुवारी रोजी जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर टाकला होता. हा व्हिडिओ पाहताच हिंदुत्ववादी संघटनांनी तिच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत तिच्या विराेधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मृणालला तातडीने अटक करावी अशी मागणी केली होती. बदलापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत जाधव हिला अटक केली होती. ती सध्या न्यायालयीन काेठडीत आहे. जाधव हिने प्रथम अंबरनाथ न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज अंबरनाथ न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर तिने पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होती.

या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष राणी जवळेकर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या वतीने वकिल रेश्मा भोपी यांनी युक्तीवाद केला. जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी हिंदुत्ववादी संघटनाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी न्यायालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकिल भोपी यांनी युक्तीवाद केला की, आरोपी जाधव हिला जामीन मंजूर केल्यास या प्रकरणातील तपास कामात हस्तक्षेप केला जाऊ शकतो. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत जाधव हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील फिर्यादी जवळेकर यांनी सांगितले की, २६ मार्च रोजी रामनवमी आहे. श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जाधव हिला न्यायालयाने जामीन नाकारल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Controversial Rama Statement: Mrunal Jadhav's Bail Rejected by Court

Web Summary : Mrunal Jadhav's bail plea was rejected by Kalyan court after her controversial video about Lord Rama sparked outrage. Hindu organizations protested, leading to her arrest. Her judicial custody continues at Adharwadi jail. International Bajrang Dal filed the complaint against Jadhav.
टॅग्स :Courtन्यायालय