आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 07:07 IST2024-12-27T07:07:43+5:302024-12-27T07:07:54+5:30

अंबरनाथमधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले

Conspiracy to kill MLA Balaji Kinikar police arrested two | आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट

आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट

अंबरनाथ : शिंदेसेनेचे अंबरनाथचे आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, शहरातील शिवसेनेच्याच दोघांना चौकशीसाठी बोलावले आहे. 

किणीकर हे लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच सोहळ्यात २६ डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी दिल्याची माहिती स्वतः किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. किणीकर आणि शिंदेसेनेचे माजी शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात गेल्या वर्षभरात राजकीय संघर्ष वाढला आहे. 

Web Title: Conspiracy to kill MLA Balaji Kinikar police arrested two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.