"अँक्शन मोडवर या अन्यथा..." कल्याण पूर्वेत रस्त्याच्या कामावरुन शिंदे सेनेच्या नगरसेवकाने अधिकाऱ्याला झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:08 IST2026-02-09T22:07:33+5:302026-02-09T22:08:21+5:30

अँक्शन मोडवर या अन्यथा खुर्चीत बसू देणार नाही. तोंडाला काळे फासू असा इशारा नगरसेवक गायकवाड यांनी प्रभाग अधिकाऱ्यास दिला आहे.

Come on action mode or else Shinde Sena corporator slaps official over road work in Kalyan East | "अँक्शन मोडवर या अन्यथा..." कल्याण पूर्वेत रस्त्याच्या कामावरुन शिंदे सेनेच्या नगरसेवकाने अधिकाऱ्याला झापले

"अँक्शन मोडवर या अन्यथा..." कल्याण पूर्वेत रस्त्याच्या कामावरुन शिंदे सेनेच्या नगरसेवकाने अधिकाऱ्याला झापले


कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव पाडा येथील रस्ता बिल्डरच्या सोयीसाठी अडवून ठेवला असल्याचा आरोप शिंदे सेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे.त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. नागरीकांची गैरसोय असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक गायकवाड यांनी प्रभाग अधिकारी उमेश यमगर यांना झापले. अँक्शन मोडवर या अन्यथा खुर्चीत बसू देणार नाही. तोंडाला काळे फासू असा इशारा नगरसेवक गायकवाड यांनी प्रभाग अधिकाऱ्यास दिला आहे.

तिसगाव पाड्यातील रस्त्याचे काम रखडले आहे. हा डीपी रस्ता आहे. तो पुढे १०० फूटी रस्त्याला जोडला जाणार आहे. या रस्त्यााचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरीकांची गैरसाेय होत आहे. बिल्डरच्या सोयीसाठी हा रस्ता रखडल्याचा आरोप नगरसेवक गायकवाड यांनी केला. प्रभाग अधिकारी यमगर यांच्यासह नगरसेवक गायकवाड यांनी सोमवारी पाहणी केली. या पाहणी दरम्यान नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले की, नागरीकांना या प्रभागातून आम्हाला मतदान केले आहे. त्यांची रस्त्यासाठी अडवणूक केली जात आहे.

हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यात यावा. अधिकाऱ्याने केवळ कार्यालयात बसू नये. अँक्शन मोडवर येऊन काम करावे. अन्यथा त्यांना खुर्चीत बसू दिले जाणार नाही. तोंडाळा काळे फासू असा इशारा दिला आहे. नगरसेवक गायकवाड यांचा संताप पाहून प्रभाग अधिकारी यमगर यांनी रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावले जाईल असे आश्वासन दिले आहे.
 

Web Title : कल्याण पूर्व में सड़क कार्य में देरी पर पार्षद ने अधिकारी को फटकारा।

Web Summary : कल्याण पूर्व में शिवसेना पार्षद महेश गायकवाड़ ने सड़क निर्माण में देरी के लिए एक अधिकारी को फटकार लगाई, उन पर बिल्डरों का पक्ष लेने और नागरिकों की उपेक्षा करने का आरोप लगाया। उन्होंने काम में तेजी लाने की चेतावनी दी।

Web Title : Corporator rebukes officer over road work delays in Kalyan East.

Web Summary : Shiv Sena corporator Mahesh Gaikwad slammed an official in Kalyan East for delaying road construction, accusing them of favoring builders and neglecting citizens. He warned of action if the work wasn't expedited.