भयानक ! केमिकलचे पाणी थेट रस्त्यावर, केमिकलच्या पाण्यातूनच धावताहेत गाड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 16:26 IST2021-03-19T16:25:01+5:302021-03-19T16:26:56+5:30

KDMC News : कल्याण डोंबिवलीकरांसाठी प्रदूषणाची समस्या काही नवीन नाही. एकीकडे उग्र वासाने  नागरिकांना श्वास घेणे देखील मुश्किल झालय तर दुसरीकडे  रासायनिक  सांडपाणी थेट  वाहतुकीच्या रस्त्यावरच जमा होत आहे

Chemical water is directly on the road, vehicles are running through chemical water | भयानक ! केमिकलचे पाणी थेट रस्त्यावर, केमिकलच्या पाण्यातूनच धावताहेत गाड्या 

भयानक ! केमिकलचे पाणी थेट रस्त्यावर, केमिकलच्या पाण्यातूनच धावताहेत गाड्या 

कल्याण - कल्याणडोंबिवलीकरांसाठीप्रदूषणाची समस्या काही नवीन नाही. एकीकडे उग्र वासाने  नागरिकांना श्वास घेणे देखील मुश्किल झालय तर दुसरीकडे  रासायनिक  सांडपाणी थेट  वाहतुकीच्या रस्त्यावरच जमा होत असल्याने नाईलाजाने चालकांना या सांडपाण्यातूनच वाट काढत जाव लागतंय.  त्यामुळे  रासायनिक कंपन्या या सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालयं. प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे  येथील प्रदूषण आणि त्यामुळे घडणारे अनुचित प्रकार यांची टांगती तलवार कायम नागरिकांवर आहे. 

कल्याण   पूर्वेतील चक्की नाका परिसरात  विहिरीत साचलेल्या सांडपाण्यामुळे पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर डोंबिवलीतील खंबाळपाडा परीसरात  चेंबर साफ करताना रासायनिक सांडपाणी व त्यामुळे निर्माण झालेल्या घातक गॅस मुळे तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. 

 वास्तविक पाहता पालिका हद्दीत असणाऱ्या  रायासानिक कंपन्या, त्या नेमक्या कुठे वसल्या आहेत, त्यातून निघणा-या सांडपाण्याचा  योग्य तो निचरा  होतो का? हे सांडपाणी पाण्याच्या कोणत्या स्रोतांमध्ये सोडले जाते ? याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह ,पालिका प्रशासनानेही कायम सतर्क असणे आवश्यक आहे.  प्रशासकीय अनास्थेने आजवर अनेक बळी घेतले असले तरी  अजून किती घरातील दिवे  विझण्याची वाट पाहिली जात आहे? हाच प्रश्न निर्माण  झालाय. 

Web Title: Chemical water is directly on the road, vehicles are running through chemical water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.